स्व-द्वैत
मी तुला पाहिले त्याला
प्रकाशवर्षे झाली
त्याहून वेळ अधिक
तू तारा होऊन झाली
किती आकाशगंगानी
हे सतत विस्तारावे
अन असशील कुठे तू ते
पुंजके जरा शोधावे
की तू त्याही पलीकडले
अस्तित्व जे निरंतर
फक्त मनास जाणवते
अंतरातले अंतर
का सोडून हा जन्म
विदेही होऊन जावे
अन मनातले अंतराळ
मुक्तपणे उधळावे
रचना: मुकुंद इंगळे