Friday, December 23, 2022
Sunday, December 11, 2022
Shadows of joy
Shadows of Joy
U just tell ur tales of ur perfect timing..to be at right place at right time.
The Sun is on opposit side..but the small leaves oppose it..to design ur destiny.
The light is important to spread the shadow.But this dark Delight shade of shadow leaves beautiful size of leaves...over my mind...which is exactly like this amazing beautiful bird.
It can fly anywhere anytime..with the wings of wishes.
But right now standstiil...unaware about the awesome back-drop.
This is "The moment" of bird wearing the shadow of happiness, joy and my alike mind watching the bird watching.
U can imagine about next moment but u can nest this moment in ur mind...forever.
Enjoy it.
PUN-day-MI-c by
Mukund Ingale
http://manmukta.blogspot.com
Monday, December 5, 2022
वाट की रस्ता?
Fakemytrip by Mukund
म्हणजे (काही खरे काही खोटे)
वाट..की रस्ता
अगदी असाच वैताग आला होता मला..तुमच्यासारखाच. घरातून बाहेर पडलं की जो रस्ता आहे त्याच्या डावीकडे गेलो की पुढे एका देवळाजवळ तो संपतो.उजवीकडे गेलो तर स्टेशनकडे किंवा हायवेकडे असे पर्याय आहेत पण येऊन जाऊन कसेही जा..परत घराकडे याल. पुणे, नाशिक, सिल्वासा...त्याच दिशा..तेच रस्ते.. तीच वळणे.पार कंटाळा आला होता त्याच त्याच रस्त्याने पुन्हा पुन्हा जाऊन.अगदी चक्रात अडकल्यासारखे झाले होते.
असाच बाहेर पडलो आणि चक्क लोकलने माथेरान गाठले...आणि हा रस्ता "वाटेत" भेटला.
निवांत बसलोय त्याच्याकाठी.मला नवा आहे पण त्याचा मला कुठे पोहोचवण्याचा आग्रह देखील जाणवत नाहीय.बस तो आहे आणि मी आहे.
नेमका काय फरक आहे.. वाट कधी म्हणायचं आणि रस्ता कधी म्हणायचं? प्रथम भेटतो तेव्हा अनोळखी रस्ता असतो.आपण त्यावरून रोज ये जा करू लागतो आणि त्याची "वाट" होते.आणि सतत एकाच वाटेवरून चालताना एक दिवस प्रचंड कंटाळा येतो आणि पावले नव्या रस्त्याच्या शोधात निघतात.जेव्हा तो सापडतो तेव्हा त्याच्या गंतव्य स्थानाबद्दलची अनभिज्ञता,कुतूहल मनाला आनंद देते...
नाही.. मी इतक्यात उठणार नाहीय. अजून काही काळ तरी मी त्याची "वाट" करणार नाही.अज्ञात दिशेला नेणारा हा रस्ता मनाच्या मातीत रमला आहे..राहूदे असाच.
आपल्या मनात उमटणाऱ्या विचारांचे देखील असेच आहे बहुतेक.चाकोरीत अडकायला लागले की आपण कंटाळतो आणि मग नव्याने शोधू लागतो नवा विचार...नवी कृती.
येताय का सोबत.. वाट सोडून रस्ते शोधायला?
मुकुंद इंगळे
9323611034
Monday, November 28, 2022
वात - चाल
Sunday, November 27, 2022
Saturday, November 19, 2022
Wednesday, November 9, 2022
Monday, November 7, 2022
Sunday, November 6, 2022
एका दिवसात दोनदा सेक्युलर
Friday, November 4, 2022
अद्वैत
Tuesday, November 1, 2022
भग्न मग्न
Sunday, October 30, 2022
दोन गुलाब
Thursday, October 13, 2022
Saturday, September 17, 2022
Thursday, August 25, 2022
Sunday, July 3, 2022
सर विठ्ठलाची
Thursday, June 9, 2022
Tuesday, May 31, 2022
Wednesday, May 18, 2022
Tuesday, April 12, 2022
स्व-द्वैत
Sunday, March 27, 2022
Saturday, February 5, 2022
लता...आयुष्याची ल(य) ता(ल)...
आज दि 6 फेब्रुवारी 2022... तुम्ही गेलात पण सोबत तुमचा स्वर आणि सुर मागे ठेऊन गेलात, देऊन गेलात....कायमचे.
लताजी...
मी आणि बँकेतले मित्र. गद्रे . देवस्थळी आणि धाट.. 1983 साली लताजींच्या वाढदिवसाला भेटायला तडक प्रभु कुंज ला गेलो होतो.त्या परदेशात गेल्या होत्या त्यामुळे भेट झाली नाही..पण उषाताई भेटल्या..श्रीकृष्णाचा एक फोटो,त्यामागे माझी कविता आणि पुष्पगुच्छ त्यांना दिला..! उषाताईनी पण ,मी दीदी आल्या कि नक्की तुमच्या शुभेच्छा त्याना देईन असे सांगुन आश्वस्त केले.
तरीही भेट झाली नाही म्हणुन थोड्या उदास मनाने, समोरच्या महालक्ष्मी मंदिरामागे असलेल्या हॉटेल मध्ये चहा घेत
बसलो होतो. फारशी गर्दी नव्हती. आणि अश निवांत क्षणी तिथल्या रेडिओवर जे अप्रतिम
अवीट गाणं लागलं... ते आधीपण अनेकदा ऐकलं होतं. पण त्या दिवशी त्याचा नव्याने अर्थ
समजला..आणि आजही ते गाणं ऐकताना पुन्हा तो दिवस आठवतो आणि भावविश्व बहरुन जाते.
ते गाणं होतं...
तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया, साथ होगा
मेरा साया, मेरा साया...
त्या दिवशी समुद्र किनारी लताजींची भेट झाली होती ती अशी.
आमची यात्रा सफल झाली होती. देवीच्या "स्वर-रुप" स्वरुपाचे दर्शन त्या
दिवशी झाले होते.
त्यांना त्यादिवशी दिलेली भेट ... ती ही कविता.
लता
विद्युलता तू मृदुलता तू
सप्तसुरांची विपुलता तू
शब्दगंध देऊनी फुलता तू
श्वासांतरातील अबोलता तू
जीवनातील तरलता तू
स्वरस्वयंभू ती तर लता तू
कर मंगेशा ही दीर्घ लता तू
सर्वार्थे मंगेश "कर" लता तू
मुकुंद इंगळे
26/09/1983
मो: 9323611034