चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
(वि)मानस वेध
ही अध्यात्माची पहिली पायरी आहे...हा माझा हात हवेत असलेल्या विमानाला पकडू पाहतोय.मला ते विमान हवं आहे..जर हा माझ्या बालपणचां फोटो असेल तर माझी उत्कंठा,कुतूहल तुम्ही समजू शकाल.जर हा मोठे झाल्यावरचा असेल तर हा केवळ गंमतीचा,अशक्य गोष्टीचा निर्माण करण्यात आलेला क्षण आहे...असे तुम्ही म्हणाल...आणि एक छानसे स्मितहास्य कराल.
कारण मधल्या काळात मी कदाचित विमान जवळून पाहिले असेल…कदाचित त्यातून प्रवास देखील केला असेल..तीच गोष्ट तुम्हालाही लागू. जेव्हा तुम्ही आणि मी..दोघेही समान ,विमान म्हणजे काय,ते किती मोठे असते इत्यादी जाणून घेतल्यानंतरच्या पातळीवरून त्याकडे पाहू तेव्हा त्यातली अशक्यता लक्षात येईल.
परमेश्वर या विमानासारखा असावा..हाती यावसा वाटत असेल तर २ पर्याय..
पर्याय एक म्हणजे हात इतका मोठा हवा की हा क्षण प्रत्यक्षात येईल..
पर्याय दोन..मनाने एकदा विमानाचे विशाल स्वरूप जाणून घेतले की या चित्रातल्या हातात विमान खरोखरीच पकडता आल्याचा आनंद होईल..
या वेळी तुमच्या चेहऱ्यावरचे स्मित दोन्ही पर्याय यशस्वीरित्या अंगिकारल्यामुळे उमटेल.
असे स्मित माझ्या चेहऱ्यावर उमटत नाही तोपर्यंत मी पहिल्याच पायरीवर रहाणार.
लेखन:मुकुंद इंगळे