चित्र वेध (चित्र सौजन्य:मीना गोगटे)
ओलावा
खूप सुंदर चित्र आहे हे. काही पाण्याचे थेंब, दवबिंदू नसावेत..आणि एक फुलपाखरू त्या थेंबास कदाचित प्राशन करण्याच्या विचारात आहे.अर्थात त्याच्या मानाने तो थेंब मोठा आहे…वरती एक आकाराने मोठा थेंब दिसतोय.कदाचित या आधी फुलपाखरू तिथे बसले असेल आणि त्याच्या फडफडण्यामुळे,
पंख लागून दोन छोटे थेंब एकमेकात मिसळून गेले..सहजपणाने..अस्तित्व न लोपता थेंबाने आपले आकारमान वाढवले.आपल्याला हवं तेवढं पाणी पिऊन झाल्यावर कदाचित या सर्व थेंबांचे देखील तसेच होईल का? जर तसे झाले तर मोठ्या भागावर पाणी झिरपेल आणि ओलावा टिकेल, रुजेल निदान काही काळ तरी.पाणी न मुरण्या इतका पृष्ठभाग कठीण असेल तरी तो भाग,पाण्याची वाफ होऊन ते नाहीसे होईपर्यंत तरी ओला राहील.
आजच्या धावपळीच्या कोरड्या जगात, भावनेच्या थेंबातला ओलावा असाच पसरायला हवा.मने जोडली जातील आणि जोडलेलीच राहतील.
बघुया या विचारांचे फुलपाखरू आपल्या मनावर कधी बसतंय ते.ले
लेखन: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment