Sunday, December 11, 2022

Shadows of joy

 Shadows of Joy

U just tell ur tales of ur perfect timing..to be at right place at right time.

The Sun is on opposit side..but the small leaves oppose it..to design ur destiny.

The light is important to spread the shadow.But this dark Delight shade of shadow leaves beautiful size of leaves...over my mind...which is exactly like this amazing beautiful bird.

It can fly anywhere anytime..with the wings of wishes.

But right now standstiil...unaware about the awesome back-drop.

This is "The moment" of bird wearing the shadow of happiness, joy and my alike mind watching the bird watching.

U can imagine about next moment but u can nest this moment in ur mind...forever.

Enjoy it.

PUN-day-MI-c by

Mukund Ingale

http://manmukta.blogspot.com

Monday, December 5, 2022

वाट की रस्ता?


Fakemytrip by Mukund

म्हणजे (काही खरे काही खोटे)

वाट..की रस्ता

अगदी असाच वैताग आला होता मला..तुमच्यासारखाच. घरातून बाहेर पडलं की जो  रस्ता आहे त्याच्या डावीकडे गेलो की पुढे एका देवळाजवळ तो संपतो.उजवीकडे गेलो तर स्टेशनकडे किंवा हायवेकडे असे पर्याय आहेत पण येऊन जाऊन कसेही जा..परत घराकडे याल. पुणे, नाशिक, सिल्वासा...त्याच दिशा..तेच रस्ते.. तीच वळणे.पार कंटाळा आला होता त्याच त्याच रस्त्याने पुन्हा पुन्हा जाऊन.अगदी चक्रात अडकल्यासारखे झाले होते.

असाच बाहेर पडलो आणि चक्क लोकलने माथेरान गाठले...आणि हा रस्ता "वाटेत" भेटला.

निवांत बसलोय त्याच्याकाठी.मला नवा आहे पण त्याचा मला कुठे पोहोचवण्याचा आग्रह देखील जाणवत नाहीय.बस तो आहे आणि मी आहे.

नेमका काय फरक आहे.. वाट कधी म्हणायचं आणि रस्ता कधी म्हणायचं? प्रथम भेटतो तेव्हा अनोळखी रस्ता असतो.आपण त्यावरून रोज ये जा करू लागतो आणि त्याची "वाट" होते.आणि सतत एकाच वाटेवरून चालताना एक दिवस प्रचंड कंटाळा येतो आणि पावले नव्या रस्त्याच्या शोधात निघतात.जेव्हा तो सापडतो तेव्हा त्याच्या गंतव्य स्थानाबद्दलची अनभिज्ञता,कुतूहल मनाला आनंद देते...

नाही.. मी इतक्यात उठणार नाहीय. अजून काही काळ तरी मी त्याची  "वाट" करणार नाही.अज्ञात दिशेला नेणारा हा रस्ता मनाच्या मातीत रमला आहे..राहूदे असाच.

आपल्या मनात उमटणाऱ्या विचारांचे देखील असेच आहे बहुतेक.चाकोरीत अडकायला लागले की आपण कंटाळतो आणि मग नव्याने शोधू लागतो नवा विचार...नवी कृती.

येताय का सोबत.. वाट सोडून रस्ते शोधायला?

मुकुंद इंगळे

9323611034