Monday, January 29, 2024

समर्पण

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

समर्पण

ते ताजतवानं आहे

ते गुणांच्या अनेक तरल पाकळ्यांनी बहरलेले आहे

ते आकर्षक रंगाचे आहे

ते अनेक पदरी पाकळयातून फुललेले आहे

त्याच्या सर्व पाकळ्या केंद्रीभूत जाणिवेच्या केशर 

तुऱ्यांशी संलग्न आहेत

ते बोटांच्या पंच महाभूतांमध्ये स्थिर आणि स्थित आहे

परमेश्वराच्या हाताची अंगीभूत ऊब त्याला लाभली आहे

परमेश्वर ते आपल्याला अर्पण करतो आहे

इतकं सुंदर मन आपण कुणालाही अर्पण करू..

परमेश्वर समजून..

भक्तीच्या,प्रेमाच्या,स्नेहाच्या सुवासाची त्यात भर घालून...

एका सार्थ समर्पणाप्रती...

लेखन:मुकुंद इंगळे 




No comments:

Post a Comment