Saturday, January 13, 2024

चंद्रसंस्कार

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

चंद्रसंस्कार 

वाहत्या पाण्यावरील चंद्राचे प्रतिबिंब किती सुंदर दिसते आहे...जणू प्रतिबिंबातून त्याची किरणे द्रवरूप होऊन वहात आहेत.त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा रंग सुद्धा मोतिया झाला आहे.रात्रीचा हा खरोखरच अदभुत नजारा आहे.

चंद्र मनाचा कारक आहे.त्याचे प्रतिबिंब जीवन प्रवाहात क्षणोक्षणी उमटत असते.सूर्याचां प्रखर प्रकाश तो परावर्तित करताना त्याला शीतल, आल्हाददायक करतो..त्यांना मोत्याचा रंग देतो.आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण देखील ..त्याला आपला विशिष्ट रंग,आपली समज,आपली बाजू.... देऊन जीवनप्रवाहात परावर्तित करत असतो...करत राहतो.आणि आपल्या सहवासात आलेला प्रत्येकजण त्यात भिजून जातो..किंवा आपल्यासाठी नवा चंद्र होतो.

मनात वाहणाऱ्या विचारांचा हा मोतिया क्षण मनातच गोठला गेलाय.

लेखन:मुकुंद इंगळे

No comments:

Post a Comment