Thursday, January 11, 2024

शबरी माला

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

शबरी माला

तिच्या परडीत मोगऱ्याची लांबलचक माला आहे, 

तिच्या मुंडू साडीच्या श्वेत रंगासारखीआणि तुळस सुद्धा 

आहे.ती दर्शनाला निघाली आहे. देवळात शिरण्याआधी 

ती पुष्करणी च्या पायरीवर थांबली.तिच्या मनात काय 

आले कुणास ठाऊक.ती तिथेच बसली. परडीतल्या 

मोगऱ्याचा मोहक घमघमाट सुटला होता.पण तरीही 

तिने मनभर,दीर्घ श्वास घेऊन त्या मोगऱ्याचा सुगंध 

मनसोक्त अनुभवला...

देवाला जी गोष्ट वहायची असते ती परिपूर्ण असावी…

या साठी कदाचित तिने तसे केले असावे.

ती आजच्या युगातील शबरी आहे...जिने मोगऱ्याची माला 

अर्पण करण्याआधी त्याच्या सुगंधाची खात्री करून घेतली. 

आता ती देवळात जाईल आणि ती माला निश्चिंत मनाने 

“त्याला” अर्पण करेल...आणि तुळशीपत्र देखील ठेवेल 

आपल्यातील अहंकारावर ..

अर्पण ते समर्पण हा तिचा प्रवास पूर्ण होईल आणि 

मोगऱ्याच्या सुवासाने गाभारा भरून जाईल.

लेखन:मुकुंद इंगळे


No comments:

Post a Comment