Wednesday, January 17, 2024

स्वप्न फुल

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
स्वप्न फुल
आपली स्वप्ने "तो" फुलपाखरांच्या पंखावर ठेवतो…
तरी त्यांना समजत नाही,इतकी ती तरल असतात.
आपण फुले पाहताना त्या फुलाभोवती भिरभिरणारी 
फुलपाखरे त्यातील एक स्वप्न आपल्या नजरेतून, 
मनामध्ये अलगद रुजवते.आणि ते फुलू लागते.

पूर्ततेच्या या फुलाला पहायला फुलपाखरे परत जवळ 
येतात. तेव्हा लक्षात येते की..  
स्वप्नफुल उमललंय खरं...पण त्याभोवती भिरभिरणारी 
फुलपाखरे नजरेला पुन्हा नवे स्वप्न देऊन गेलीत.
लेखन:मुकुंद इंगळे

http://manmukta.blogspot.com/

No comments:

Post a Comment