Sunday, January 14, 2024

संक्रमण

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
संक्रमण
असीम आकाशात संक्रांतीला असंख्य पतंग जन्माला येतात, दिसू लागतात.उडवणारे आपापल्या परीने बदवत असतात आणि काही पतंग भरपूर उंची गाठतात..
तर काही थोडे खालून उडतात.काही दुसऱ्या उडणाऱ्या पतंगांपेक्षा वरचढ असतात ते मांजाने इतर पतंगाना कापून टाकतात आणि जमिनीवर असणाऱ्या त्याच्या मालकाची त्याला गोते खात बघताना आणि त्या हेलकावे घेणाऱ्या पतंगाला पकडताना दमछाक होते.
कुणाचा मांजा धारदार तर कुणाचा मांजा गुंतल्यावर त्यावर येणारा ताण जास्त. निमित्त काही असो...त्या पतंगाची दिशा आणि दशा बदलते आणि तो जमिनीकडे येऊ लागतो. असं झालं की..नशिबाने आपली फिरकी घेतली असे समजून परत 
नवा पतंग घ्यावा..नवा मांजा घ्यावा..आणि फिरकी नियतीकडे सोपवावी.
कारण पतंग म्हणजे आपली स्वप्ने आणि मांजा म्हणजे त्यांना 
साकार.. "मान जा" म्हणण्यासाठी घेतलेली मेहनत.
कदाचित नवा पतंग आपले आकाश गाठू शकेल...नाही..तर परत एक नवा घ्यायचा.
आपले पाय वास्तवाच्या जमिनीवर ठेऊन आकाशात 
एकामागोमाग स्वप्नांचे पतंग उडवत ठेवायचे..
यालाच संक्रमण म्हणत असावेत बहुधा..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 
लेखन : मुकुंद इंगळे

No comments:

Post a Comment