Friday, January 12, 2024

मेघ छाया

चित्र वेध 

(चित्र सौजन्य:श्री प्रकाश पिटकर)

मेघ छाया

कधी कधी मनावर विचारांच्या ढगांची 

विशाल आकाराची सावली पडते.

सावलीमुळे काही काळ मन झाकोळून जाते…

तात्पुरती असली तरीही सावलीत ते काही काळ रमते.. विसावते..!

वाहणारे बदलाचे वारे सावलीला पुढे पुढे ढकलतात आणि पुन्हा परिस्थितीच्या उन्हात एखाद्या डोंगराप्रमाणे ते स्थिर अविचल उभे राहते... 

ऊन,पाऊस, वादळ वारे झेलत. आपल्या 

साऱ्या संभाव्य क्षमता वापरून, त्यांचा सामना करत.

पण ढगाच्या सावलीतला तो एक क्षण,मनाला प्रचंड उभारी देऊन जातो.

लेखन:मुकुंद इंगळे

No comments:

Post a Comment