चित्र वेध (चित्र सौजन्य: मीना गोगटे)
निळावले मन
सोबत स्वतःचे प्रसन्न निळेशार आकाश आपल्या पंखांवर घेऊन उडणारे फुलपाखरू ही मनाची वृत्ती आहे.
पाकळ्या,केशर नसलेल्या फुलात मकरंद मिळणार नाही हे त्याला ठाऊक नसेल का?
पण तरीही त्यावर बसलंय. दुसऱ्या फुललेल्या फुलातून टिपलेला मधाचा सूक्ष्म थेंब या सुकलेल्या फुलात ओतायला..या आशेवर...नव्हे खात्री असावी त्याला की हे पण एक दिवस परत फुलेल.
या मधासाठी तरी अजून एखादे फुलपाखरू इथे येईल.येताना आपले परागकण लगडलेले नाजुक पाय घेऊन यावर बसेल.या निळ्या फुलपाखराने ठेवलेला थेंब ते प्राशन करेल...
आणि काही दिवसांत हे फुल पुन्हा उमलेल.
"आज फिर जिनेकी तमन्ना है" इतकचं ऐकू येईल...नंतर येणाऱ्या फुलपाखरांना.
मरनेका इरादा चा प्रश्नच नाही
ज्या क्षणी या फुलपाखराने आपल्याकडचा मकरंद त्या फुलाला दिला...त्या क्षणी त्याच्या पंखात ते गहिरे,क्षितिजसीमा नसलेले अनंत आकाश समरसून गेले.
ती एक वृत्ती आहे.
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment