मुशाफिरी
निळ्याशार जीवनाचा प्रवास चालू असावा आकाशाखाली
मनाच्या तितक्याच अथांग निळ्या जळात देहाची
नाव घेऊन घालावी काळाच्या वाहत्या प्रवाहात ..
कधी शांत तर कधी रौद्र प्रवाहात..
कधी दूःखाची वादळे अनुभवावीत तर कधी मधूनच
सुखाची बेटे दिसावीत.
रोज नवे आशा आकाक्षाचे सूर्योदय अन सूर्यास्तही पाहावेत..
पाहावेत रोज नव नवे आकाशात उडणाऱ्या पक्षांचे थवे..
भावनांचे आणि सागरतळी वावरणारे, अधूनमधून दिसणारे
स्वप्नांचे मासे..
व्हावे नतमस्तक पंचमहाभूतांपुढे.. टळटळीत उन्हात तर कधी
विखुरलेल्या चांदण्यात...
रोज नवे किनारे जोडावे... सोडावे... श्वासांचा सुकाणू 'त्याच्या'
हाती असलं तरी बंदरावर सोडायचे दोर आपल्या हाती ठेऊन....
ते जिथे सोडायचे तिथे नाते जोडायचे..
पुढे निघायचे मनातल्या नव्या किनाऱ्याच्या शोधात येणाऱ्या
प्रत्येक क्षणाला वाहू द्यावे… जाणाऱ्या प्रत्येक श्वासात... अनंतकाळ.
रचनाः मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment