Friday, January 26, 2024

परिस्थिती

चित्र वेध (चित्र सौजन्य: अनामिक)

परिस्थिती

तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे..

मध्यंतरी परिस्थिती बरीच बिघडली होती..

परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली होती..

पण आता परिस्थिती थोडी सुधारते आहे..

मागे परिस्थिती भीषण दिसत होती..

पण परिस्थिती दिसते तशी रहात नाही...

परिस्थितीचे हे खरे वास्तव चित्र आहे..

परिस्थितीने वेदना दिल्यात,चटके दिलेत..

पण तेवढेच दु:ख भोगले देखील..

म्हणून आज ही परिस्थिती आहे..

पण परिस्थिती बदलू लागली..

अशा परिस्थितीने संयमाने बदलाची,सुधारण्याची वाट पहिली..

डोळे झाकून आत पाहिले नी परिस्थिती बदलू लागली..

परिस्थिती सुधारली की जगणे सुसह्य होईल..

आता मात्र काळानुरूप बदलत्या, सुधारणाऱ्या परिस्थितीचा 

खरा मोहक चेहरा, एक अम्लान स्मित घेऊन,

हळू हळू जगासमोर येत आहे..

तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे..

परिस्थितीची..

लेखन: मुकुंद इंगळे




No comments:

Post a Comment