चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
जरा सी आहट होती है...
हे गुलाबाचं फुल कुणीतरी ठेवलंय..कुणासाठी तरी.तुम्ही समोर आलाच आहात तर विचार करा...हे तुमच्यासाठीच असेल का?
नेमके असे प्रेमबंधात, स्नेहबंधात, मर्मबंधात असणारे किती जण आहेत...जे तुमच्यासाठी असा गुलाब ठेऊन जातील.
विचारात पडलात?
या विचारात कुणाकुणाची आहट...म्हणजे चाहूल जाणवते आहे .
उलटा विचार करु..तुम्ही जर असे फुल ठेवले असते तर ते कुणासाठी, कुणाकुणासाठी ठेवले असते.विशेषत: घेणाऱ्याला ..ते तुम्ही ठेवलंय हे वेगळं सांगायची गरज पडणार नाही इतक्या खात्रीचे.
फक्त विचार करा..उत्तर ज्याचे त्याला ठाऊक.
खरं तर हे फुल म्हणजे आपलं मन आहे.आणि ते परिस्थितीच्या चौकोनी..चार दिशांच्या खांबावर आपणच ठेवले आहे..रोज ठेवतो आपण ते...आणि आपलं मनच चाहूल घेतंय... की कारण कुठलेही असो...आज आपल्या अंतरात कोण पोहोचणार ? जो हा गुलाब उचलेल तो की ज्याला आपण हे फुल देऊ तो.?
जगात अनोळखी कुणीच नसतं आणि ओळखीचं पण कुणीच नसतं.म्हणून हे फुल ठेवलंय.जो घेईल तो ओळखीचा...नुसता समोरून जाईल तो अनोळखी.
थांबा...कुणीतरी येतंय..
बघुया
कही ये वो तो नहीं !
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment