Sunday, July 3, 2022

सर विठ्ठलाची

मना होई हर्ष
पाऊस पाहून
थेंब थेंब येई
वारकरी होऊन

सुरू झाली वारी
सरींची साजरी
जग झाले वाटे
पंढरी पंढरी

दर्शनाने त्याच्या
भरे अंतरंग
भक्तीत ओल्या
भिजे पांडुरंग

No comments:

Post a Comment