Monday, May 17, 2021

 


Bench mark आयुष्याचा

 

 




मला आठवतंय की

बरेचदा आपण तिथे बसलेले असायचो....

बोलायचोठरवायचो..!

कुणा मैत्रिणीच्या लग्नासाठी काढलेली मेंदी तू दाखवली होतीस एकदा...

त्यावेळेसच चैत्रात तुझ्या हातावरच्या रेषा पण पाहिल्या होत्या ..

एकदा अचानक आलेल्या पावसाने आपल्याला मस्त भिजवले होते...

तुझ्या ओल्या हातावरचे ओघळणारे पाण्याचे  थेंब खूप सुंदर चकाकत होते.

मग बराच काळ आपण भिजतच राहिलो 

एकमेकांत.

 

इथेच तू त्यादिवशी म्हणाली होतीस "आता 

भेटणे शक्य नाहीम्हणून..

जेव्हा आठवणींचा पालापाचोळा आजूबाजूला तसाच पडून होता तेव्हा...

आणि हे सांगताना तू थरथरत्या हाताने माझा अन 

बाकाचा हात घट्ट 

धरून ठेवला होतास..

ग्रीष्म सुरू झाला आणि त्यानंतर ऋतू बदललाच नाही..

मी अनेकदा इथे यायचो त्यानंतर..

तुझे भास आणि स्पर्शाचे आभास निरखत 

बसायचो.

आज संध्याकाळीच आलोय..वसंतवर्षा

शिशिर आणि ग्रीष्म इतका प्रवास झालाय...

दमलो नाही थकवा नाही.. कारण तुझी भेट.!.

हे बघ बाकी साऱ्या हिरव्या सृष्टीत आपल्या 

आठवणींचे हे बाजूला वाढलेले

फुललेले रंगीबेरंगी झाड बघण्यासाठी येतो मी इथे नेहमी.

तटस्थपणे पहात बसतो हे झाड...दुरून..

काहीसे अंतर राखून आणि 

तुला अंतरात राखून..!

आत्ता चुकून आलीस तर लगेच बसू नकोस या बाकावर...आठवणींचा रंग 

अजून ओला आहे..

या रंगीबेरंगी झाडाची खाली इतस्ततः पडलेली रंगीत पाने फुले पाहिलीस ना..

कदाचित पुढच्या काही दिवसात हा बाक पण असाच "रंगुनजाईल.. 

रंगीत पानेफुलें त्यावरती गळून पडण्याइतके हे झाड पण वाढत राहील.

मी इथेच असेंन एकटा..या बाकासारखा..

फक्त "रंगूनगेलेला आणि रंगून "गेलेला"..!

चित्रकथा:  मुकुंद इंगळे



No comments:

Post a Comment