Saturday, February 5, 2022

लता...आयुष्याची ल(य) ता(ल)...

आज दि 6 फेब्रुवारी 2022... तुम्ही गेलात पण सोबत तुमचा स्वर आणि सुर मागे ठेऊन गेलात, देऊन गेलात....कायमचे.

लताजी...

मी आणि बँकेतले मित्र. गद्रे . देवस्थळी आणि धाट.. 1983 साली लताजींच्या वाढदिवसाला भेटायला तडक प्रभु कुंज ला गेलो होतो.त्या परदेशात गेल्या होत्या त्यामुळे भेट झाली नाही..पण उषाताई भेटल्या..श्रीकृष्णाचा एक फोटो,त्यामागे माझी कविता आणि पुष्पगुच्छ त्यांना दिला..! उषाताईनी पण ,मी दीदी आल्या कि नक्की तुमच्या शुभेच्छा त्याना देईन असे सांगुन आश्वस्त केले.

तरीही भेट झाली नाही म्हणुन थोड्या उदास मनाने, समोरच्या महालक्ष्मी मंदिरामागे असलेल्या हॉटेल मध्ये चहा घेत बसलो होतो. फारशी गर्दी नव्हती. आणि अश निवांत क्षणी तिथल्या रेडिओवर जे अप्रतिम अवीट गाणं लागलं... ते आधीपण अनेकदा ऐकलं होतं. पण त्या दिवशी त्याचा नव्याने अर्थ समजला..आणि आजही ते गाणं ऐकताना पुन्हा तो दिवस आठवतो आणि भावविश्व बहरुन जाते.

ते गाणं होतं...

तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया, साथ होगा

मेरा साया, मेरा साया...

त्या दिवशी समुद्र किनारी लताजींची भेट झाली होती ती अशी. आमची यात्रा सफल झाली होती. देवीच्या "स्वर-रुप" स्वरुपाचे दर्शन त्या दिवशी झाले होते.

त्यांना त्यादिवशी दिलेली भेट ... ती ही कविता.

लता

विद्युलता तू मृदुलता तू

सप्तसुरांची विपुलता तू

शब्दगंध देऊनी फुलता तू

श्वासांतरातील अबोलता तू

जीवनातील तरलता तू

स्वरस्वयंभू ती तर लता तू

कर मंगेशा ही दीर्घ लता तू

सर्वार्थे मंगेश "कर" लता तू

मुकुंद इंगळे

26/09/1983

मो: 9323611034

 

 

1 comment:

  1. मुकुंदा,अप्रतिम लयबध्द काव्य आणि लेखातील भावनाही.असं लिखाण होणं हा एक परमेश्वरी शुभसंकेतच आहे.काही दिवसापूर्वी मी या कवितेची तुझ्या बरोबर बोलताना आठवण काढली होती आणि आज त्यांच देवाघरी जाणं ऐकल्यावर ही तुझीच आठवण आली. त्यांचा आशीर्वाद आहेच तुझ्या पाठीशी.

    ReplyDelete