चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
एक "सुर"म्य उनाड दिवस
चला..इतके वर आलोच आहोत तर जरा थांबू. कदाचित..हा किंचित शिडकावा करणारा पाऊस थांबेल आणि वाऱ्याचा अवखळ अनुराग नादच फक्त कानी येत राहील.. सून री पवन,पवन पुरवइया(भैरवा) सारखा..
तो तिकडे दिसणारा काळा ढग बरसो रे मेघा म्हणत बरसायला लागेल..आणि सरींच्या आवाजात ऐकू येत राहील…फक्त "मेघ मल्हार"
कदाचित
वाऱ्याने हा आसावरी काळा मेघ पुढे ढकलला जाईल,जाता जाता इतर मेघांना सांगेल मेरी याद मे तुम ना आँसु बहाना आणि प्रकाशाची तीव्रता वाढून समोरचे
दृश्य आणखी स्पष्ट दिसू लागेल..
कदाचित
पुढल्या पांच मिनिटात हा पूर्ण परिसर धुक्याने भरून जाईल..आणि सगळं दिसेनासं होईल कदाचित…आपण इथेच रमु दुपारपर्यंत..हवेत गारवा असल्याने हलकेसेच मधुवंती उन जाणवत राहील.. "अजहू ना आये बालमा"तल्या विरहासारखे
कदाचीत
तुम्हाला आज इथून हलावेसे वाटणार नाही..सूर्यास्त आता होईलच थोड्या वेळात..
अंतर्मुख का होताय? कुणाची तरी आठवण येतेय ना?....नाहीतर ही आत्ताची
"ये पहले प्यार की खुशबू,मेरे सासोंको महका राही है...अशी सुगंधी हुरहूर नसती लागली ..
पुरिया धनश्री आठवणींनी घायाळ करू लागलाय ..
चला..खाली आपल्या रिसॉर्ट मध्ये जाऊ.
अतिशय सुंदर शांत रात्र ..नीरव शांततेत दरबारी कानडा दरवळावा…आणि कुठे एफ एम वर लागलेले गाणे ऐकू यावे.. अस्वस्थता वाढवणारे.."मैं निगाहे तेरे चेहरे से हटाऊ कैसे"
रात्र आता उत्तररात्र झालेली आहे चांदण्यांनी आकाश भरून गेलेले आहे.भैरवी आता आकाशभर आणि मनात भिनु लागली आहे.
कुणाच्या तरी आठवणीत व्याकूळ,तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजात.. ऐकू येतंय स्वतःचे गाणे
"हमें तुमसे प्यार कितना ये हम नही जानते"...
उत्तररात्र भैरवी सारखीच गाण्यासोबत दरवळत रहाते.
लेखन:मुकुंद इंगळे
फारच सुंदर
ReplyDelete