Monday, October 20, 2025

WILLक्षण

(चित्र सौजन्य: सौ कुमुदिनी भालेराव)
WILL क्षण 

नुकताच नव्या विचारांचा पाऊस पडून गेलाय.. मनाच्या काही घट्ट जोडल्या गेलेल्या चाकोऱ्यांच्या फरशांवर..

आणि बाजूला दिसणाऱ्या..मनाच्याच दिशेने वाहत येणाऱ्या विचार प्रवाहावर.

एक क्षण येतो की जिथे आपल्याला ठरवावं लागतं...एक काहीतरी निवडावं लागतं.

किंवा असही असेल की दोन्ही समन्वयाने प्राप्त होतंय .

नाती,मैत्री इत्यादींचे प्रकाशणारे दिवे वाट दाखवत असतात..संस्कारातून,चाकोऱ्यांच्या तयार झालेल्या घट्ट, दिसणाऱ्या फरशांवरून,आजूबाजूला दिसणाऱ्या अनुभवांच्या झाडांसोबत. 

आणि प्रवाहातदेखील त्यांची प्रकाशबिंबे तितकीच तरंगत असतात.

पण चालायला आपलं आपल्यालाच लागतं.

नवा ओलावा आत हळूहळू झिरपून कोणती तरी एखादी फरशी थोडी सैल करेल.

प्रवाह त्याच विचारधारेला पुढे वाहत घेऊन जाईल.

आयुष्य असंच असतं...कधी फरशीवाल्या वाटेसारखं तर कधी प्रवाहासारखं.मात्र जगात असताना कालौघात ही जागा नेमकी कधी येईल...नव्हे ..या जागी आपण नेमके कधी पोहोचू आणि नवनव्या विचारात भिजून जाऊ...?

कळेल..ते ही कळेल.

क्षणभर इथेच थांबून या चित्राकडे पहा.

ते स्थिर असले तरी त्यात दिसणारी वेळ वाहती आहे.

हीच ती वेळ हाच तो क्षण...

आयुष्य जगतानाचा प्रत्येक क्षण

WILL क्षण

लेखन : मुकुंद इंगळे 

२१ ऑक्टोबर २०२५

No comments:

Post a Comment