Saturday, April 1, 2023

ऊर्जा चक्र

ऊर्जा चक्र
हा बघा आमच्या कुटुंबाचा फोटो ..नीट बघा. 
मी, माझे कर्तव्य आणि जबाबदारी याचा एकत्र काढलेला फोटो आहे.
आयुष्य नावाच्या माळरानावर काढलाय.मी तिथेच असतो दिवसरात्र.माळरान असलं तरी खूप छान आहे.मागे दिसत आहेत स्नेहाची, मैत्रीची हिरवीगार झाडे. वर नित्य सोबत रहाणारे,असणारे चाकोरीचे ढगांचे पुंजके.कधी मनाप्रमाणे हवेहवेसे शुभ्र तर कधी विषादाने काळवंडलेले. आणि नियतीचा कधी वादळी झंजावात तर कधी आल्हाददायक झुळूक.
रोज मला माझ्या आस्तित्वाच्या आसाभोवती फिरवणारी ..
मागच्या सूर्यप्रकाशात सुरू आहे माझे चक्र..
तो कधी अस्त पावेल तेव्हा पावेल.
तोपर्यंत फिरत रहायचे..
नियतीकडून वेगाने ऊर्जा घेत आणि जगण्याची नवी उर्मी आवेगाने निर्माण करत...
परत एकदा नीट निरखून पहा आमचा प्रसन्न हसतमुख फोटो... 
प्रचंड ऊर्जेने भारलेला...!
रचना: मुकुंद इंगळे


No comments:

Post a Comment