काडी - मोल
फुले, पाने काही नसताना देखिल इतकी फुलपाखरे नुसत्या उगवलेल्या शुष्क काडीला चिकटली आहेत..जणू सारी बंदीवान.
जोपासना केली पाहिजे काडीची.मग ती हिरवीगार होईल, वाढेल. त्यावर पाने येतील..काही दिवसांनी फुले पण येतील.
आणि मग आत्ता स्थिर बसलेल्या फुलपाखरांना त्यांच्याभोवती भिरभिरत रहाता येईल.
भिरभिरणे ही त्यांची सहजावस्था..या फुलातले परागकण त्यांच्यासोबत इतरत्र पसरतील आणि कुठेतरी नवे अंकुर रुजतील.
मन हिरवे असेल तर स्वप्नांची फुलपाखरे नुसतीच स्थिर बसणार नाहीत... आनंदाच्या फुलांभोवती बेभान होऊन भिरभिरत रहातील त्या मनाभोवती.
रचना: मुकुंद इंगळे
सुंदर, सकस लेखन.
ReplyDelete