वेल डन
रोजच्या धावपळीत मनाच्या शोभिवंत कुंडीत काही बीजे वाहून येतात.काही रुसतात तर काही रुजतात.रुजलेली स्नेहाच्या शिंपडण्याने सहवासाच्या मातीत उमलू लागतात.हळूहळू सुसंवादाच्याच्या खताने जोमाने वाढू लागतात.अन् एक दिवस त्यांना नात्याचे निळे निरभ्र आकाश दिसू लागते.नात्याची वेल आता मुक्तपणे विश्र्वासाचा आधार घेत बहरू लागते..जाणाऱ्या काळानुरूप विश्वास वेगळ्याच उंचीवर तिला घेऊन जातो.तिला नवे धुमारे फूटतात आणि त्यांचीही पाती वेगळी फुलू लागतात.. वाढू लागतात.ती एकतर नात्याची नवी पिढी तयार होते...नाहीतर जुन्या नात्याचा नव्याने बहरलेला आविष्कार असतो. वेली बहरताना एकमेकांत गुंफत जातात..गुंतत जातात.रागाचे तण मात्र दिसताक्षणी काढून टाकावे लागतात.
आणि वेल छानपैकी बहरत रहाते.
मात्र मनात शोभिवंत कुंड्या अनेक असल्या तर त्यातून बहरलेल्या आयुष्यातल्या विविध नात्यांच्या वेलींकडे पाहताना एकच विचार मनात येतो....
वेल डन
लेखन: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment