चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक). मन मोतिया रंगाचे
दुसऱ्याचे मन आपल्याला आणि आपले मन दुसऱ्याला नजरेतून कळते.पण नजर म्हणजे फक्त डोळे नव्हेत. नजर म्हणजे मनाची भावावस्था.
मनाची अनुभूती आनंदाची असो अथवा दुःखाची... मायेच्या ओलीची असो अथवा कोरड्या तुटलेपणाची,मिलनाची असो किंवा विरहाची, विचाराची असो किंवा अविचाराची, रागाची असो किंवा अनुरागाची,त्यागाची असो किंवा समर्पणाची,स्वार्थाची असो किंवा उदात्ततेची..निवांत सावलीची असो अथवा उन्हाच्या चटक्याची..
त्या अनुभूतीची तीव्रता अश्रुचा पाहिला थेंब..मोती मनात तयार करते..
आणि
पापण्यांच्या शिंपल्यांच्या कोंदणात हळूच उमलू लागतो चमकणारा पाण्याचा एक थेंब..एक मोती..आणि नंतर एकामागोमाग एक मोती उमलतच रहातात.
अश्रुंकडे पाहायला नेहमीच स्वतःची ओली मनमोतिया रंगाची नजर लागते...
स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या अश्रुंकडे पाहताना.
कारण त्याक्षणी त्या नजरेत भिजलेले मन आपण पाहू शकतो.
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment