चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
अस्तित्व...एक पान
पृथ्वी नावाच्या विशाल आणि नित्य बहरलेल्या झाडावर, कितीतरी पाने रोज गळून पडतात आणि नवी देखील उगवतात...मन नावाच्या त्यांच्या देठाला पोषक हरितद्रव्य त्यांना ...जिथे उमलली तिथली जमीन देते.हवामान उष्ण,थंड अथवा समशीतोष्ण असो...झाडाला पान हे लागणारच. पान हीच झाडाची ओळख होऊन जाते.आपल्या अंगावरच्या शिरा ताणून पान ती ओळख सांगत असते.
असे पान जेव्हा देवाला वाहिले जाते तेव्हा त्यात नेमका काय बदल होत असेल...
'स्व'ची जाणिव संपत असेल..अस्तित्वाचा खरा अर्थ लक्षात येत असेल कदाचित.
कुणीतरी.. आपल्याला वाहण्यास योग्य झाल्याशिवाय... वाहणाऱ्याला नेमके आपल्यालाच उचलून वाहण्याची बुद्धी
'तो 'देत असावा.वाहणाऱ्याचा बुद्धीत होणारा हा बदल...त्याच्या वृत्तीत उतरतो,भक्तीत उतरतो..तो पानामुळे.
आणि वाहिलेले,अर्पण केलेले पान देवाच्या मुर्तिजवळ शांतपणे राहून भक्त आणि देव यांच्यातील माध्यम होत असते.
आपण वाहिलेले पान?आपण कोण?आपण वाहणारे कोण?
आपण सुद्धा फक्त एक पानच आहोत याची जाणीव फक्त ते पान करून देत रहाते.
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment