प्रयत्न..एक आकलन
ती नेमकं काय करते आहे? तीर गाठण्यासाठी तिच्यासमोर कोणती आव्हाने आहेत?
तोल जाऊन पडू न देणे हे एकच आव्हान.(परिस्थिती)
उंच टाचेच्या बुटांमुळे पाय स्थिर ठेवणं कठीण जातंय. (वस्तुस्थितीचे आकलन)
पुढचा दगड निवडताना,या आणि त्या दगडातले अंतर महत्वाचे.(नियोजन)
मागील बाजूस पण एक सपाट दगड आहे..पण त्यावर जाण्यासाठी दिशा बदलावी लागेल..(प्राप्त परिस्थितीत पर्यायी योजना )
पुढील दगड कोणता याचा निर्णय घ्यायला लागणारा वेळ कमीत कमी असायला हवा..(उपलब्ध वेळ)
या पुढील सपाट दगड त्यामानाने लांब आहे.. मधे कदाचित पाय पूर्ण ठेवता येणार नाही असा दगड आहे (निरीक्षण)
त्या दगडावर काही क्षण टेकून पुढील सपाट दगडावर जाता येईल...(संधीची चाचपणी)
एकदा का त्या पलिकडच्या सपाट दगडावर जाता आले की तीरावर जाता येऊ शकते (लक्ष्याचा अभ्यास)
हे सगळे प्रश्न जिला पडलेत ती तरुणी आहे.(योग्य क्षमता)
किनाऱ्यावरील कोणी मदतीचा हात देण्याची शक्यता (ही शक्यता शून्य मानून योजना आखावी लागेल)
वरील सर्व गोष्टी एकाच शब्दात...(प्रयत्न)
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment