Tuesday, February 13, 2024

व्हेलेंटाईन डे

चित्र वेध (चित्र स्थळ:रुस्तमजी अझ्झियानो ठाणे)

आज वेलंटाईन डे..प्रेम कसं करावं याचं प्रतीक असलेले म्युरल परवा पाहण्यात आले.

दोघेही सुंदर बगीचामध्ये बसले आहेत.एकमेकांच्या इतके प्रेमात आहेत की खाण्यापिण्याची गरज वाटत नसावी.परस्परांवर जीवापाड प्रेम असल्यामुळे दोघांकडेही स्वतः ची ह्रदये नाहीत.

त्यामुळे म्हणूनच की काय..हृदय आणि पोट या जागांवर पोकळी नव्हे...अवकाश आहे.

प्रेमात पडलेल्यांच्या मेंदूला फारसे काम त्या गुलाबी क्षणी तरी उरलेले नसते..कारण मन अधीर आणि मेंदू बधीर अशी अवस्था असते.त्याप्रमाणे या दोघांना पूर्वी मेंदू असल्याची ...आणि वास्तवातल्या अनुभवाने तो पुन्हा जागृत झाला, तर असावी म्हणून आता रिकामी दिसणारी, त्याची जागा तशीच आहे.

त्याच्या डाव्या हाती लाल रंगाचे गुलाब पुष्प आहे. (ज्यांना ते दिसत नसेल त्यांनी कधी कुणावर जीवापाड प्रेम केले नसावे :-)

तिने आपला उजवा हात सहजपणे दुमडलेल्या पायावर ठेवला आहे आणि...ती.. तो जे बोलतो आहे ते मन लावून ऐकते आहे.

ते दोघेही एकमेकांत मग्न,मश्गूल आहेत.

ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन बसलेत...त्यांच्या हातात देखील अवकाश आहे...त्यांचं स्वतःचं.

हा सुंदर क्षण त्यांच्या आयुष्यात कायम मौल्यवान राहील..जोपर्यंत पाहणाऱ्याच्या नजरेत कुणासाठी तरी निस्सीम प्रेम असेल.

त्यांच्या नजरेत पहा तुम्हाला आपला चेहरा दिसतोय का?

Happy Velentine Day

लेखन: मुकुंद इंगळे 



No comments:

Post a Comment